पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षणाचे नवे धोरण

*शिक्षणाचे नवे धोरण, नवी आव्हाने!* ---------------------======--------- बदलत्या विश्वानुसार विविध क्षेत्रांत होणारे परिवर्तन लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भारताला शिक्षणपद्धतीची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्यात आश्रम व्यवस्था, गुरुकुल पद्धती, योगी व ऋषींना असणारे महत्त्व, तक्षशिला व नालंदा विद्यापीठ आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आज समाजाच्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे, तसेच शिक्षणक्षेत्रात जी सात्विकता टिकून आहे त्यामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक विभूतींचे मोलाचे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर 'ग्लोबल एज्युकेशन' ही नवी संकल्पना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात व्यापक बदल होणे अपरिहार्य झाले आहे. बदल स्वीकारला तरच प्रगती - हा विचार रुजतोय. मात्र, हा भौतिक बदल होत असताना मूल्ये व संस्कृती संवर्धनाबरोबरच बदलत चाललेली मानसिकता संतुलित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील विद्यार्थी व शिक्षणपद्धती : प्रत्येक पालकाच्या अपेक्षा असते की, आपला पाल्य हुशार असावा, त्याचा ...